25 जुलैपासून डिजिटल इंडिया सप्ताह

0
slider_4552

 25 जुलैपासून
डिजिटल इंडिया सप्ताह,
नागरिकांना मिळणार केंद्रीय
योजनांची माहिती, जाणून
घ्या अधिक…

दिल्ली :

भारत सरकारतर्फ दिनांक 25 ते 31 जुलै दरम्यान
‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून
सर्व नागरिकांना ई-गव्हर्न्स सेवांबद्धल माहिती देण्यात
येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा यासाठी हा
सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी
पूर्व नोंदणी केल्यास नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये
सहभाग घेता येईल.

भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील काम जगासमोर आणणे, टेक
स्टार्टअप साठी सहयोग व व्यवसायाच्या नवीन संधी शोधणे,
नवीन पिढीला प्रेरणा देणे, नागरिकांना ई-गव्हर्न्स सेवांची
माहिती देणे आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे
यासाठी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय
स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून
त्यात सहभागी होण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg ह्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्यांनाही या क्षेत्रातील
नवनवीन तंत्रज्ञान विषयांवरील व्याख्याने आणि चर्चा
यामध्ये सहभागी होण्याची विनामूल्य संधी याद्धारे
उपलब्ध होणार आहे.

See also  2030 च्या मध्यापर्यंत या 'आपत्तीजनक पूर' जीवनावर सतत आणि अनियमित परिणाम करतील : नासा