पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी – संजय काकडे

0
slider_4552

पुणे :

भाजपचे नेते पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लवकरच जाहीर होईल,अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र अद्यापपर्यंत निवडणुक आयोगामार्फत कोणत्याही प्रकारचा पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. त्याच दरम्यान भाजपचे नेते सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेला काही तास होत नाही. तोवर आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणुक लढविणार अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या चर्चेवर भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा निवडणुक लढवावी अशी मी पत्राद्वारे मागणी केली आहे. पुण्यामधून नरेंद्र मोदी यांनी निवडणुक लढविल्यास महाराष्ट्रात सर्वाच्या सर्व 48 जागा भाजप जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले की,मागील 9 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपला देश प्रगती पथावर आहे. अनेक देशात नरेंद्र मोदी यांचे स्वागत आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणुक लढणार अशी चर्चा सुरू झाल्यावर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर हे मोदी विरोधात निवडणुक लढविण्याची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यावर संजय काकडे म्हणाले की,आपल्या देशात लोकशाही आहे.

त्यामुळे कोणाच्याही विरोधात कोणी निवडणुक लढवू शकते. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा,पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी ही थांबले. तर त्याच डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय राहणार नाही अशी भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली.

See also  महानगरपालिकेच्या हद्दीतील 2020 पर्यंतची गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याची अंमलबजावणी करावी : एकनाथ शिंदे