अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण

0
slider_4552

पुणे :

जाहिरात फलकांमुळे परिसर बकाल होत आहे. तसेच अनेक अपघाताच्या शक्यता देखील निर्माण होत आहेत. ठिकठिकाणी लावलेल्या जाहिरातींपैकी किती जाहिराती प्रशासनाची परवानगी घेऊन लावल्या आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. पिंपरी-चिंचवड , पुणे शहर आणि परिसरात हे बेकायदेशीर जाहिरातींचे लोन पसरले आहे. परवानगी शिवाय लावलेल्या जाहिरातींमुळे शासनाचा महसूल बुडतो.

शासनाचा महसूल बुडण्या पेक्षा अधिक महत्वाची बाब म्हणजे अनधिकृत जाहिरात फलकांची कोणतीही नोंद होत नाही. त्यामुळे त्याच्यावर निगराणी राखून संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाला शक्य होत नाही.

पाम्पलेट, बॅनर, भिंतींवरील चित्रे आदींच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. या जाहिराती लावण्यासाठी चक्क झाडांना खिळे ठोकले जातात. शहरात अनेक संवेदनशील नागरिक अशा झाडांचे खिळे आणि झाडांमध्ये अडकलेल्या संरक्षक जाळ्या काढण्याचे काम करतात. अशा उपद्रवी लोकांमुळे खिळे काढण्याचे काम आणखी वाढून जाते.

अनेकदा अशा जाहिरात फलकांमुळे अपघातांचा धोका निर्माण होतो. विविध राजकीय पक्षातील अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी शहरात ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात येतात. असे पोस्टर लावण्यासाठी प्रशानाकडून परवानगी दिली जाते. मात्र यातील किती फ्लेक्स परवानगी घेऊन लावले जातात, हा देखील संशोधनाचा विषय आहे.

See also  विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्ही आत्मसात करावे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी