कुपवाडा येथे शिवछत्रपतीच्या अश्वारूढ पुतळ्याचे जल्लोषात अनावरण संपन्न.

0
slider_4552

कुपवाडा :

कुपवाडा जिल्ह्यातील भारत पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ४१ राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियन येथे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे प्रत्येक भारतवासियासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत असतानाच याच वर्षी हा पुतळा कुपवाडा येथे उभारला जाणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील डोंगराच्या मागेच पाकिस्तान आहे, पाकिस्तानकडे निधडया छातीने हातात नंगी तलवार घेऊन उभा असलेला हा शिवछत्रपतींचा पुतळा त्यांच्या छातीत धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही, असे मत यावेळी बोलताना मुख्यमंतत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आणि देशभरात मार्गक्रमण करताना जागोजागी स्वागत होत होत हा पुतळा जम्मू आणि काश्मीरच्या मातीत आला आहे हे अभिमानाची बाब असून हा उपक्रम यशस्वी करणाच्या सर्वाचे तसेच सर्व लष्करी अधिकाऱ्याचे यासमयी जाहीर आभार मानले. महाराष्टाला त्यागाची आणि शौर्याची मोठी परंपरा असून त्यांचे अनेक दाखले आजवर पहायला मिळाले आहेत. त्या परंपरेची रुजवात मराठी धमन्यांमध्ये ज्यांनी केली, त्या शिवछत्रपतींचा हा पुतळा प्रत्येक सैनिकाला कायमच ऊर्जा देण्याचे काम करेल असे मत यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केले.

कुपवाडा येथील ४१ राष्ट्रीय रायफल्स यांच्या आवारातील स्मृती स्थळाला वंदन करून या महान रेजिमेंटसाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृर्तींना विनम्र अभिवादन केले. तसेच या शुभदिनी रेजिमेंट मधील जवानांच्या साथीने फराळ करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.यावेळी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मेजर जनरल गिरीश कालिया, ब्रिगेडियर तपनकुमार भान, कर्नल नवलगट्टी, जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री रवींद्र गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव आणि लष्करातील इतर सर्व प्रमुख अधिकारी, जवान आणि हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

See also  लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर स्त्री बनलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तीलाही घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत सवलत..