पुणे :
अंमली पदार्थ विक्री प्रकरणात ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलीसांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काळे आणि जाधव असे त्या दोघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे दोघे कोर्ट कंपनीत ललित पाटीलच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. तिथूनच त्यांनी ललितला पळून जाण्यास मदत केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ललितला पुणे आणि नाशिक येथे अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र त्याचा डाव फसला. त्यानंतर अनेकजणांची अटक सत्रे झालीच आता यामध्ये पोलिसांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.