बाणेर :
पुणे दिनांक 10 डिसेंबर रोजी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यांचल हायस्कूल तर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।। अखंड स्थितीचा निर्धारू 1 श्रीमंत योगी ।। • असे वर्णन असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे पैलू उघडून दाखवणारा आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असा भव्य दिव्य कार्यक्रम विद्यांचल हायस्कूलच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी सादर केला.
शिवरायांच्या अंगी असलेल्या मूल्यांचे दर्शन या कार्यक्रमातून दाखवण्याचा एक सुंदर प्रयत्न केला गेला. या कार्यक्रमात 850 मुलांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डाफोडिल इंटरनॅशनल स्कूल पुणे च्या मुख्याध्यापिका स्वप्ना गुप्ते व छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज माननीय मारूती आबा गोळे उपस्थित होते, तसेच स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज करणसिंह रणवीर मोहिते उपस्थित होते –
उपस्थितांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना शिवरायांच्या गडकिल्ल्यांची माहिती दिली, तसेच शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य व जीवनमूल्ये याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, संस्थेचे संचालक अशोक मुरकुटे , सदस्य भालचंद्र मुरकुटे , रंजनाताई मुरकुटे, श्वेता मुरकुटे, योगिता बहिरट उपस्थित होते.
तबलावादनाद्वारे गणेशव वंदना करून व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित शिवरायांच्या आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही आरती शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सादर केली. यानंतर महाराष्ट्राला लाभलेल्या संतपरंपरेचे दर्शन दिंडीच्या रूपाने घडवण्यात आले. यानंतर शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटना- शिवाजी महाराजांचा जन्म, बारसे, स्वराज्याची प्रतिज्ञा, तोरणा किल्ला जिंकणे पुरंदराचा तह, आग्र्याहून सुटका, पावनखिंड, शाहिस्ताखान युद्ध आणि शिवराज्याभिषेक विद्यार्थ्यांनी मनोवेधक नृत्य व अतिशय सुंदर प्रॉप्स यांचा वापर करून प्रेक्षकांसमोर जिवंत केल्या.
हा कार्यक्रम केवळ शिवचरित्राचे दर्शन नव्हे, तर शिवरायांना मानवंदना होती. कार्यक्रमाची सांगता शिवरायांच्या भव्य राज्याभिषेकाने करण्यात आली आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला जोरदार टाळ्यांच्या जल्लोषात ‘हर हर महादेव’ व ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन भरघोस प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय मनीषा कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका रूपाली भावसार व शिव इतिहासाच्या अभ्यासक सायली गोडबोले जोशी यांनी मोलाचा हातभार लावला