पाषाण :
पाषाण येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक १४ च्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ व पाहणी दौरा संपन्न झाला. सर्व्हे नंबर ५ निम्हण मळा ते सर्व्हे नंबर १३ आयव्हारी इस्टेट या ३० मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच पाषाण स्मशान भूमी नूतनीकरण शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रभाग क्रमांक 14 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. तीस मीटर लांबीचा अतिशय चांगला आवश्यक असणारा रस्ता त्याला दोन्ही बाजूने फूटपाथ, सायकल ट्रॅक, केबल डक्ट अशा सर्व गोष्टी ने सुसज्ज रस्त्याचे भूमिपूजन आणि कामाचा शुभारंभ होत आहे. विविध विकास कामे होत असताना नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून अतिशय जलद गतीने ही कामे पुर्ण व्हावी असा मी प्रयत्न करत असतो. बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी परिसरातील गेल्या काही वर्षापासून रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येईल. नव्याने समाविष्ट गावातली पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. बावधन येथील नागरिकांनी पी एम आर डी च्या जागेमध्ये शासकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली त्यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.
यावेळी युवा नेते सुर्यकांत भुंडे यांनी पीएमआरडी च्या मोकळ्या जागेमध्ये बावधन परिसरातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी पुणे महानगरपालिका प्रशासक आयुक विक्रम कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, युवा नेते सूर्यकांत भुंडे, दिपक दगडे, अभिजीत दगडे, कुणाल वेडे पाटील, डॉ.सागर बालवडकर, समीर उत्तरकर, अमित खानेकर, बालम सुतार, योगेश सुतार, सुजाता भुंडे, सविता दगडे, अश्विनी दगडे, प्रा. रूपाली बालवडकर, कांचन दगडे, पुनम विधाते, महेश हांडे, किशोर कांबळे, माजी नगरसेवक शंकर केमसे, संदिप बालवडकर, प्रदीप हुमे आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुस खिंडीतील पुलाच्या कामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी सदर पुलाचे काम सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल असे यावेळी सांगितले.