पुणे :
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाषाण येथे 38 दिवस सुरू असलेल्या अशितोष आमले यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला शिवसेना उपनेते विधानपरिषदेचा माजी आमदार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख अशितोष आमले, डॉ. दिलीप मुरकुटे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, शिव सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब भांडे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख राजेंद्र धनकुडे, सरपंच मयुर भांडे, कमलेश सुतार, अजय निम्हण, अजिंक्य सुतार सुनील राजगुरू, विजय निम्हण, अजय धावरे आदी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शिवसैनिक गेले ३८ दिवस शेतकरी प्रश्नांला पाठिंबा देण्यासाठी बसले आहे. याची दखल निश्चित घेतली जाईल.
यावेळी रवींद्र मिर्लेकर यांनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये मांडलेल्या प्रश्नांची माहिती घेतली. तसेच सध्या या कायद्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती देण्यात आल्याने राज्य सरकार हा कायदा लागू करणार नसल्याचे देखील यावेळी सांगितले. यावेळी पाषाण, सुतारवाडी, बाणेर, म्हाळुंगे परिसरातील परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.