पाषाण :
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुसरोड जनसंपर्क कार्यालय येथे निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, भाजपा उपाध्यक्ष राहुल कोकाटे, रत्नाकर मानकर, सतीश पाषाणकर, विनायक विध्वंस, प्रविण आमले, सुहास पाषाणकर, संतोष वेल्हाळ, शरद पाषाणकर, विजय सुपेकर, उत्तम जाधव, राजेश कौशल,पराग काप्रे, प्रथमेशजी, आकाश पवार, मंगेश आंबरुळे उपस्थित होते.